उस्मानाबाद -  जिल्हा परिषदतंर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेव्दारे भरण्यासाठी होणारी परीक्षा 34 केंद्रावर 16 नोंव्हेंबर व 22 नोंव्हेंबर रोजी  या दिवशी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी  वरील परीक्षेच्या दिवशी परीक्षा पेपरचे एक तास अगोदर व एक तास नंतर आदेश लागू केले आहेत.
            परीक्षा केंद्राच्या परीसरात झेरॉक्स, फॅक्स, ईमेल, रेडीओ, इंटरनेट सूविधा भ्रमणध्वनी, मोबाईल, संगणक ,गणनायंत्र, कॅलक्युलेटर व अशा इतर प्रकारच्या बाबी परीक्षार्थींना पुरवठा करता येणार नाही. केंद्र परीसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही.‍परीक्षार्थी  अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. पानपटटी, टायपींग सेंटर, एस. टी. डी. बुध, ध्वनीक्षेपक, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्रात मोबाईल, फोन, सेल्युलर फोन, फॅक्स इ-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील.
              परीक्षेसी  संबंधित नसलेल्या व्यक्तीना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. (इतरांना उमेदवारांच्या नातेवाईकासह प्रवेश असणार नाही.)तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही,  परीक्षा  केंद्रावर काम करणारे अधिकारी व कर्मचारी ,परीक्षार्थी , परीक्षा केंद्रावर निमराणी करणारे अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी ,कर्मचारी,  यांचेसोबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्यास अनुषंगाने लागू राहणार नाही. या आदेशाचे अवमानना केल्यास भारतीय दंडविधानाचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.                                      
 
Top