उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भूसंपादन, भूमि अभिलेख या कार्यालयांना भेट देऊन अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित आहेत का, याची पाहणी केली. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
    सकाळी 10 वाजता कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून महसूल विभागाला अचानक भेट दिली. त्यानंतर पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आदींनाही भेटी दिल्या. कर्मचारी वेळेवर येतात का, उपस्थित कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली का, याची पाहणीही त्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे यावेळी त्यांच्यासमवेत होते.
 
Top