उस्मानाबाद - लोकशाही दिनात आज सोमवारी झालेल्या बैठकीत  महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख, भूसंपादन, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद अशा विविध शासकीय विभागातील एकूण 38 तक्रारी प्राप्त झाल्या.  तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची तक्रार समजावून घेत संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांना यांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  दिले.
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात आला होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा सरकारी वकील विजयकुमार शिंदे, समाजकल्याण अधिकारी अमित घवले  यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी लोकशाही दिनासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी  ऐकून घेतल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सदर तक्रार ज्या विभागाशी निगडीत आहे, त्या विभागप्रमुखांना ती देऊन संबंधित काम पाहणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन प्रलंबित तक्रारी तात्काळ सोडवणूक करण्याचे आदेश दिले.
          जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती, जिल्हा क्षती सहाय व पुनर्वसन मंडळ, बाल संरक्षण कक्ष, जिल्हा सर्व समावेशक महिला सल्लागार समितीच्या बैठकाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी घेण्यात आल्या.
            या बैठकीला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, महिलांचे मनोधर्य उंचावण्यासाठी महिलांच्या अडचणीचे निराकरण करावे. त्यांच्यावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी सर्व समित्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे. जिल्ह्यात  18 वर्षाखालील अपंग मुले-मुलींची संख्या किती आहे यांची यादी सादर करावी, असे  त्यांनी सांगितले.
            जिल्ह्यातील नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा आढावा घेण्यात येऊन प्रलंबित प्रकरणाचा  तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश देऊन डॉ. नारनवरे म्हणाले की, ग्रामीण भागातील जमिनीबाबतचे वाद मिटविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सोडविण्यात यावेत. ज्या गावात वारंवार गुन्हांची नोंद होते त्यासाठी पडीताला बोलावून त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करुन त्यांना आधा
             महिलांच्या तक्रार निवारणासाठी विविध शासकीय विभागात काम करणाऱ्या  वर्ग-1 व 2 च्या शासकीय महिला, महिला प्राचार्य, स्वयंसेवी संस्थेच्या महिला, महिला डॉक्टर, सल्लागार, महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, टाटा इन्स्टयूट सोशल समन्वयक, रोटरी कलबच्या महिला यांची सर्व समावेशक बैठक घेण्यात यावी, अशीही सूचना यावेळी त्यांनी केली.
               या लोकशाही दिनास विविध विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
र देण्याचे कार्यही केले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.             
 
Top