बार्शी -  पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर रोजी असून शहर व परिसरातील बालकांना मन मोकळेपणाने विविध उपक्रमाद्वारे जल्लोसषात साजरा करता यावा या उद्देशाने इंडियन रेड क्रॉस संचलित सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्राच्या वतीने धमालबाल आनंद मेळावा व फनफेअर चे मोफत आयोजन केल्याची माहिती  संस्‍थेचे अध्‍यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली.
    शहरातील सुभाषनगर उपनगरातील पोष्ट ऑङ्गिस जवळील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या. सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्रामध्ये गुरुवारी (१४ नोव्हेंबर) रोजी घेण्यात येणार्‍या या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन सोलापूर जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले  यांच्या हस्ते तर बार्शी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.या वेळीउपविभागीय अधिकारी सर्जेराव ठोंबरे,पोलिस निरिक्षक सालार चाऊस, निवासी नायब तहसीलदार उत्तम पवार पोलिस, आदि मान्यवर प्रमुख उपस्थिीतीत राहणार आहेत.दुपारी ३ ते ५ या वेळेत पहिल्या सत्रात निरोगी दात स्पर्धा व दंत रोग तपासणी व तसेच बेस्ट स्माईल स्पर्धा होणार असून प्रथम तीन विजेतांना पारितोषके देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक बालकाला एक भेट वस्तू देण्यात येणार आहे.या वेळी रत्न डेंटल चे डॉ.अमोल सुराणा व त्यांचे सहकारी बालकांची तपासणी करणार आहेत. सांयकाळी ५ ते ६ या दुसर्‍यासत्रात विविध प्रकारचे कला गुण दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळेबालकांचे निखळ मनोरंजन होणार असून सांयकाळी ६ नंतरच्या शेवटच्या सत्रात टांगा, चक्कर,जंम्पींग जॅक (गादी घर),घोडा, मगर आदि सह विविध खेळ खेळणी सह विविध आकर्षक टॅटो काढून घेण्याचा आनंद बालकांना मोफत मिळणार आहे. या दिवसभराच्या धमाल जत्रा महोत्सवात कला गुण दर्शन , विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातील ३ ते १० वर्ष वयोगटाच्या बालकांसाठी या धमाल बाल आनंद मेळावा चे मोफत आयोजन करण्यात आले असून अधिक माहिती साठी प्रशांत घोडके  व प्रशांत बुडूख  यांच्याशी संपर्क करावा असे ही कूंकूलोळ यांनी सांगितले. भविष्यात या ठिकाणी शिशु विकास चर्चा सत्रे,परिसंवाद मनोरंजन खेळ ,बालविकास वर्ग , संस्कार,आरोग्य शिबीरे बाल आरोग्य शिक्षण व संगोपन क्षेत्रातील तज्ञ वक्तयांचे व्याखाने आदि चे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाल धमाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी शिशु विकास केंद्राचे मानद सचिव डॉ.बाळासाहेब देशपांडे यांच्‍या  दर्शनाखाली केंद्राचे सर्व पदाधिकारी सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.
 
Top