बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) वाडी रस्त्यावरील रिधोरे आणि पापनस जवळच्या पूलावरुन ऊसतोड कामगारांचा मालट्रक क्र.एम.एच.७२ एव्ही ४७३४ या वाहनाचा ताबा सुटून खाली कोसळला. सदरच्या अपघातात २९ कामगार जखमी झाले असल्याने त्यांना बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील वाहन पूलामध्ये कोसळल्यावर एका अंगावर स्थिर राहिल्याने मोठी जीवीतहाणी टळली आहे. जखमींना तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले. अपघातात एका वृध्दाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनेची वार्ता समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सर्जेराव ठोंबरे यांनी तात्काळ जखमींना मदतकार्य सुरु केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या आपत्कालीन पथकाने मदतकार्य सुरु केले. बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात रुग्णांच्या उपचाराचे कार्य थांबले असल्याचे लक्षात आल्यानंतर ठोंबरे यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन दिली. त्यामुळे पैशाअभावी थांबविण्यात आलेले उपचार सुरु करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांच्या उपचाराची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. सदरच्या ठिकाणी घटनेची वार्ता ताबडतोब कळविण्यात आल्यावरही डॉ.स्नेहल नडगिरे तसेच सुमारे एक तानानंतर डॉ.माळी यांनी हजेरी लावली. अपघातानंतर वाहनचालक हा फरार झाला असून त्याचा सहाय्यक निलेश फुलसिंग चव्हाण वय २६ यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छोलिस अधिकारी श्री ठोंबरे यांनी अपघातानंतर वैराग, माढा, कुर्डूवाडी येथील पथकांना तात्काळ मदतकार्यासाठी घटनास्थळी पाठविले. एसटी बस, ऍम्ब्युलन्स, ऍटो रिक्षा तसेच इतरही मिळेल त्या खाजगी वाहनांतून जखमींना बार्शीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बार्शी तहसिलचे नायब तहसिलदार उत्तम पवार यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमींची चौकशी केली.
    जखमींची नावे पुढीलप्रमाणे हिवळणी ता.पुसद जि.यवतमाळ येथील वंदना गजानन मस्के (वय ३५), वंदना भिमराव पवार (वय ६५), देवकाबाई नामदेव चव्हाण (वय ३५), रेशमा भिमराव पवार (वय १६), अनिमा सुधाकर राठोड (वय ३०), सुमन हाके (वय ५०), सुदर्शन राजू जाधव (वय ६) राजू दूधराम जाधव (वय ४०), विजय गोविंद पवार (वय ४२), मालूबाई विजय पवार (वय ३३), संजय विजय पवार (वय ६), अंबादास दुधाराम जाधव (वय ३६), काजल अंबादास जाधव (वय १३), कार्तिक राजू जाधव (वय ४), गजानन मस्के (वय ४०), शुभम विजय पवार (वय ३), उत्तम आलू राठोड, रेणुका चव्हाण, सुमन वसंत राठोड, रितेश वसंत राठोड, सुधाकर खुबा राठोड, धुरीबाई श्रवण राठोड, अवधुत हाके, कविता हाके, फुलाबाई राठोड, नामदेव चव्हाण, अंजना हाके, यमुनाबाई राठोड, सुदर्शन राजू जाधव या सर्व रुग्णांवर बार्शीत उपचार सुरु करण्यात आले आहेत.
 
Top