बार्शी - बार्शीत मागील दोन-तीन वर्षांपासून सुरु झालेल्या शहिद हजरत टिपू सूलतान जयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी परवानगी नाकारली आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
       
    दंगा काबू पथकासह मोहोळ, वैराग, पंागरी, अकलूज, माढा आदी ठिकाणहून मागविण्यात आलेल्या अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह बार्शी पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्य संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. गुन्हेगारांवर वचक बसावा, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पोलिस उपअधिक्षक सर्जेराव ठोंबरे व पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.शहरातील भाजी मंडई परिसर, भोगेश्वरी मंदिर परिसर, ख्वाजा नगर, ४२२ घरकुल, परंडा रोड, एकवीराई चौक, मंगळवार पेठ आदी भागातून पोलिसांनी संचलन केले. रविवारी अचानक पोलिसांनी केलेल्या संचलनामुळे शहरवासीयांमध्ये चर्चा सुरु होती.
 
Top