उस्मानाबाद - गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदयातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जयपाल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात (दि.7 रोजी) बैठक संपन्न झाली.
    याप्रसंगी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. बाबरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. राहूल वाघमारे, लोकप्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता शहापूरकर, श्री कुलस्वामिनी सामाजीक संस्थेचे हनुमंत सांळूके, माता अहिल्यादेवी सामाजिक संस्थेचे ॲड. विद्या साखरे, ॲड. उमा के. गंगणे यांची यावेळी उपस्थिती होती.
    या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. तसेच पीसीपीएनडीटी कलम 17 अन्वये  कायदयाचे ज्ञान होण्यासाठी दि.2 सप्टेंबर,2014 रोजी जिल्हा रुग्णालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नुतनीकरणासाठी आलेल्या एका परिपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यात येऊन त्यास परवानगी देण्यात आली.
 
Top