उस्मानाबाद -  जिल्हा परिषदतंर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेव्दारे भरण्यासाठी होणारी परीक्षा 10 केंद्रावर तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तर इयत्ता 10 वीसाठी एकुण 4 केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा  2 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर आणि 9 नोंव्हेंबर या दिवशी खालील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी  वरील परीक्षेच्या दिवशी परीक्षा पेपरचे एक तास अगोदर व एक तास नंतर आदेश लागू केले आहेत.
            परीक्षा केंद्राच्या परीसरात झेरॉक्स ,फॅक्स, ईमेल, रेडीओ, इंटरनेट सूविधा भ्रमणध्वनी, मोबाईल, संगणक ,गणनायंत्र, कॅलक्युलेटर व अशा इतर प्रकारच्या बाबी परीक्षार्थींना पुरवठा करता येणार नाही. केंद्र परीसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही.‍परीक्षार्थी  अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. पानपटटी, टायपींग सेंटर, एस. टी. डी. बुध, ध्वनीक्षेपक, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्रात मोबाईल, फोन, सेल्युलर फोन, फॅक्स इ-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षेसी  संबंधित नसलेल्या व्यक्तीना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. (इतरांना उमेदवारांच्या नातेवाईकासह प्रवेश असणार नाही.)
    तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही,  परीक्षा  केंद्रावर काम करणारे अधिकारी व कर्मचारी ,परीक्षार्थी , परीक्षा केंद्रावर निमराणी करणारे अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी ,
कर्मचारी,  यांचेसोबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्यास अनुषंगाने लागू राहणार नाही. या आदेशाचे अवमानना केल्यास भारतीय दंडविधानाचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
    कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी या पदाची परीक्षा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11-30 वाजेपर्यत जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथे होणार आहे. वित्त विभागाच्या वरिष्‍ठ सहायक लेखा परीक्षा 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11-30 वाजेपर्यत जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथे होणार आहे. आणि आरोग्य विभागाच्या औषधनिर्माता /औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा दु. 2 ते. 3-30 या वेळेत विधी महाविदयालयाच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आवार, उस्मानाबाद येथे आणि बांधकाम विभागाची  कनिष्ठ आरेखक  या पदाची  परीक्षा दु. 2 ते. 3-30 या वेळेत जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथे होणार  आहे.
    पंचायत विभागाच्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या लेखी परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11-30 यावेळेत येथील तेरणा पब्लीक स्कुल टी पी एस रोड, उंबरे कोठा, उस्मानाबाद, विधी महाविद्यालय रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आवार, श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल तांबरी विभाग, श्रीपतराव भोसले हायस्कुल तांबरी विभाग,जुनी इमारत,  श्रीपतराव भोसले हायस्कुल तांबरी विभाग नवीन इमारत- तळमजला व पहिला मजला,  श्रीपतराव भोसले हायस्कुल तांबरी विभाग नवीन इमारत-दुसरा व तिसरा मजला, अभिनव इंलिश स्कुल औरंगाबाद रोड, उस्मानाबाद,  जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला शहर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद, सरस्वती विद्यालय बँक कॉलनी, श्री. श्री. रवीशंकर विद्यामंदिर जाधववाडी रोड, उस्मानाबाद येथे या परीक्षा होतील.
    तसेच एन. टी. एस. इयत्ता 10 वीसाठी परीक्षा केंद्राची नाव व केंद्रास जोडले गेलेले तालुक्याची  माहिती पुढीलप्रमाणे आहे.
    उस्मानाबाद व तुळजापूर केंद्रास जोडलेले तालुके- परीक्षा श्रीपतराव भोसले हायस्कुल, उस्मानाबाद,  उमरगा व लोहारा तालुक्यासाठीची परीक्षा भारत विद्यालय-उमरगा, भूम व परंडा तालुक्यासाठी परीक्षा- श्री गुरुदेव दत्त हायस्कुल, भूम,  कळंब  व वाशी तालुक्याच्या परीक्षा सावित्रीबाई फुले विद्यालय, कळंब या केंद्रावर परीक्षा होतील.  अधिक माहितीसाठी   शिक्षणाधिकारी ( माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
 
Top