बार्शी - रघूनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील पूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द करुन नव्याने फेरबदल करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकार्‍यांत बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील शंकर गायकवाड यांची युवक प्रदेशाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. 
        रविवारी दि.२ रोजी पुणे येथे राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात झाली. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात आली. या बैठकित रघुनाथदादा पाटील (प्रदेशाध्यक्ष), बबनराव काळे (राज्य उपाध्यक्ष), गुलाबराव पाटील (राज्य सरचिटणीस), शिवाजीनाना नांदखिले (प्रदेश अध्यक्ष,क्रांतीसिंह नानापाटील ब्रिगेड), विभागीय अध्यक्ष- कालिदास आपेट (मराठवाडा), बाळासाहेब पटारे (प.महाराष्ट्र), संजय पोंगाडे (विदर्भ), वंदनाताई पवार (महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष)शंकर गायकवाड (प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी),आनंद भालेकर (प्रदेशाध्यक्ष,ऊसतोडणी कामगार आघाडी),विश्वनाथ पवार (प्रदेश उपाध्यक्ष), जिल्हाध्यक्षपदी- राजेंद्र भोसले (सोलापूर), पांडूरंग रायते (पुणे), हनुमंत पाटील (सांगली), पी.जी.पाटील (कोल्हापूर),विकास मुळीक (सातारा), अशोक पठारे (नगर),जगन्नाथ नाटे (नाशीक), सरदार पाटील (धुळे), संदिप पाटील (जळगाव),सयाजीराव देशमुख (उस्मानाबाद), परमेश्वर पिसूरे (बीड), अमृतराव शिंदे (परभणी), दत्तात्रण कदम (जालना), युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी - ऍड्.माणिक शिंदे (कोल्हापूर),बच्चू मोढवे (नगर), औदुंबर मोरे (सोलापूर), गजानन राजबिंडे (जालना),माऊली कदम (परभणी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    मागील चार वर्षांत शंकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांसाठी केलेल्या आंदोलनात उपोषणे, रास्तारोको, धरणे, मोर्चे, मोटरसायकल रॅली, टाळेठोक, घेराव, बोंबाबोंब आंदोलन आदी आंदोलनातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्रशासनाच्या समोर आणावयाचे काम केले. शेतकर्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडतांना शेतकर्‍यांचे मार्केट कमिटीच्या अंतर्गत प्रश्‍न, विविध नुकसान भरपाई, रस्ता, विजेचे प्रश्‍न, ऊस, कांदा, सोयाबीन इत्यादी धान्यांच्या आधारभूत किमती, पीककर्ज, यासाठी शासनाला निर्णय घ्यावे लागले. गायकवाड यांच्या निवडीने तात्या शिंदे, हनुमंत भोसले, दिलीप चव्हाण, किसन यादव, ढगे गुरुजी, ठोंबरे गुरुजी, सिध्देश्वर हेंबाडे, औदुंबर मोरे, बाळासाहेब वाळके, अजित जगदाळे, अजित परबत, नाना घोंगडे, आदिनाथ अडसुळ, शिवाजी गोरे, बालाजी सुरवसे, पंजाबराव भोसले, हनुमंत चौगुले, सुनिल बिराजदार, राजेंद्र भोसले, नामदेव भोसले, महेश केदार, प्रकाश जाधव, राजेश खराडे, निलेश हुलवडे यांसह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
   
 
Top