उस्मानाबाद -  प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कला आत्मसात करुन स्वतंत्र व्यवसाय करुन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन स्टेट बॅंक आफ इंडिया तांबरी शाखेचे  व्यवस्थापक मुकेश अयाचित यांनी केले. उस्मानाबाद येथे महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, उस्मानाबादतफे दारिद्रयरेषेखालील पुरुषांसाठी बेसिक फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी प्रशिक्षणाचा समारोप्रसंगी ते बोलत होते.
प्रास्ताविकात संस्थेचे विकास गोफणे यांनी आजपर्यंत 44 प्रशिक्षण घेण्यात आले असून यात 1230 पुरुष व महिला उमेदवारांना  प्रशिक्षण दिले असून  त्यापैकी 479 प्रशिक्ष णार्थ्यांनी  स्वत:चा स्वयंरोजगार सुरु केला असल्याचे सांगीतले. याप्रसंगी स्टेट बँकेचे प्रशिक्षक प्रवीण यांची प्रमुख  उपस्थिती होती. सूत्रसंचलन सचिन हिंगे यानी केले तर आभार प्रदर्शन कुमार हिंगे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली
 
Top