पांगरी (गणेश गोडसे) आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजारच होऊ नये, या हेतूने पांगरी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीतर्फे गावात विविध प्रतिबंधात्‍मक उपाय योजना सुरू करण्यात आल्या असून ग्रामस्थांनीही जागरूकता दाखवून आपले घर व परीसर स्वचछ ठेऊन कोणत्याही साथीच्या रोगाची लागण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवाहन सरपंच विजय गोडसे यांनी केले. ते आज  बुधवार रोजी पांगरी बस स्थानकावरून सुरू करण्यात आलेल्या विशेष प्रतिबंधात्मक मोहिमेच्या उद्घाटनप्रसंघी बोलत होते.यावेळी पांगरीचे माजी सरपंच जयंत पाटील, रामभाऊ लाडे, सतीश जाधव, भारत वाकडे, मारुती म्हसे-पाटील आदि उपस्थित होते.
  सध्या इत्तरत्र  डेंगू,मलेरिया,हिवताप आदि साथीच्या आजारांनी थैमान घातले असून याची लागण पांगरी ग्रामस्थांना होऊ नये यासाठी डास प्रतीबंधक फवारणी करून शाळा, बस स्थानक, महाविद्यालये, यासह शासकिय निमशासकीय कार्यालयासमोर निर्जंतुकीकरण पावडर टाकण्यात आली.
चौकट: अनेक गावात विविध डेंगू सदृश्य साथीच्या आजाराची लागण झाल्याचे वृत्त असतांनाही पांगरीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाकडे चिखर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचे पांगरी ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.तरी ग्रामपंचायतीबरोबरच आरोग्य विभागानेही थोडीशी आपलीही जबाबदारी आहे याचे भान राखून मोहीम हाती घ्यावी अशी पांगरी ग्रामस्थांची मागणी आहे.
 
Top