स्मानाबाद - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्यावतीने येत्या 13 डिसेंबर रोजी  उस्मानाबाद येथे दुसरी  राष्ट्रीय लोक अदालत भरविण्यात येणार असून यात भुसंपादन, मोटार अपघात तथा कामगार नुकसान भरपाईची  प्रकरणे, सर्व दिवाणी प्रकरणे तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कलम 138,  एन. आय. ॲक्टप्रमाणे असलेली प्रकरणे, वादपुर्व प्रकरणे सामोपचाराने, तडजोडीने  मिटविण्यासाठी  ठेवण्यात येणार आहेत.
    संबधित पक्षकारांची याचा लाभ घ्यावा, आपली न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे सामोपचाराने/ तडजोडीने मिटवून घ्यावेत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठस्तर) तथा सदस्य सचिव जिल्हा  सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी केले आहे.   
 
Top