उस्मानाबाद -  आगामी सण व  मोहरम सण शांततेच्या वातावरणात पार पाडता यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 प्रमाणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश  आज दि. 2 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 31 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश जारी  केले आहेत.
    या आदेशात भाडयाने राहणार व अनाधिकृत खाजगी अथवा शासकीय जागेत परराज्यातील नागरीक, परदेशी नागरीक यांनीं त्यांचे ओळखपत्रासह व ते राहत असलेल्या घरमालकांचे सहमतीपत्र व निवासाचे पत्र, सी आर पी सी कलम 144 आदेश जारी झालेल्या दिनांकापासून, भाडे तत्वावरील, दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री/ खरेदी, वादग्रस्त सीडी गाणे, सायबर कॅफेचा वापर, सिमकार्ड विक्री आणि स्फोटक साठयाची संबंधित पोलीस ठाणेस माहिती देणे आवश्यक आहे.
    दहशतवादी कारवाया करणारे व्यक्ती खोट्या नावाने, खाजगी व भाडे तत्वावर घर/लॉज येथे राहून दशहतवादी कायवाया करण्याची शक्यता असल्याने किरायाणे भाडयाने व्यक्तीची नोंद त्यांचे ओळखपत्र व निवासाच्या पत्यासह संबंधित पोलीस स्टेशनला सादर करणे आवश्यक आहे. दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री/ खरेदी करणारे लोकांकडून अनाधिकृतपणे व्यवहार झाल्यास अशी वाहने स्फोटात वापरण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह सीडी/गाणे वाजविल्याने जातीय धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस किरायाणे/ भाड्याने ठेवताना घर मालक, लॉज चालक, धर्मादाय संस्था विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालकांनी वास्तव्यास राहणारे व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला  न दिल्यास भाडयाने किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही व्यक्तीस दुय्यम प्रती मोटार वाहनाच्या खरेदी विक्री याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला  न देता विक्री/ खरेदीस मनाई करण्यात आली आहे, याची  संबधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.     
 
Top