उस्मानाबाद - सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश परीक्षेव्दारा इयत्ता 6 वी आणि 9 वीच्या विदयार्थ्यांना सन 2015-2016 सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. विदयार्थ्यांकडून ठराविक नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशासाठी  विदयार्थ्यांनी 29 नोव्हेंबर 2014 पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍याचे अवाहन  प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा यांनी केले आहे.
    प्रवेशासाठी वयोमर्यादा व परीक्षापध्दती इयत्ता 6 वीसाठी उमेदवार 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2005 (दोन्ही दिवस धरुन) 8  या कालावधीत जन्मलेला असावा तर इयत्ता 9 वीसाठी उमेदवार 2 जुले 2001 ते 1 जुलै 2002 (दोन्ही दिवस धरुन ) या कालावधीत जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा.   इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रीका फक्त इंग्रजी भाषेमधून असतील. प्रवेश संख्या 6 वी साठी अंदाजे 80 ते 85 व इयत्ता 9 वी साठी 5 अशी राहील.
    अनुसूचित जातीसाठी 15 टक्के, अनुचित जमातीसाठी साडेसात टक्के, सैनिक सेवेतील माजी व आजी कर्मचाऱ्यांची मुलासाठी 25 टक्के  (अ.ज. व अ.जा.) यांच्या राखीव जागा सोडुन राहतील. प्रवेश परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी, 2015 आहे. माहितीपत्रक/ दरपत्रक सामान्यवर्ग, सरंक्षण दल, विमुक्त जाती, भटक्या जमातील इतर मागासवर्ग वर्ग, विशेष मागासवगातील उमदेवारांसाठी रुपये 425 रुपये फक्त अनुचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमदेवारासाठी मुलांच्या जातीच्या दाखल्याची झेरौक्त प्रत जोडणे बंधनकारक असून रुपये 275 राहील. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.sainiksatara.orag या संकेतस्थळास भेट देवून ऑनलाईन प्रवेशपत्र भरावा.
         ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेंड प्रत व डिमांड डर्‌फ या त 6डिसेंबर 2014 रोजी  दुपारी 1-30 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेबाने पाठवावेत, अधिक   माहितीसाठी  प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
Top