उस्मानाबाद - सिक्युरिटी अॅन्ड इंटलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लि. नागपूर या खाजगी क्षेत्रातील कंपनी यांचेकडील सुरक्षा जवानांची पदे भरण्यासाठी सोमवार,दि. 17 नोव्हेंबर, रोजी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उस्मानाबाद येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरुष बेरोजगार उमेदवारांकरिता उद्योजकामार्फत पात्र व इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड करणार आहेत.
       या मेळाव्यात सहभाग नोंदविण्यांकरिता उमेदवारांना www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळावर लॉगीन होऊन जॉब फेअर या ऑप्शनमधून आपणस संबंधित उद्योजकाकडे मुलाखती करता उपस्थित राहावयाचे आहे. त्या उद्योजकाच्या नावापुढे ऑनलॉईन अप्लाय       (सहमती) नोंदविण्यात येऊन, आपले एन्ट्री पास ( प्रवेशपत्र ) ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावे. याकरिता या कार्यालयाकडे नांव नोंदणी केली असणे अनिवार्य आहे.
सिक्युरिटी अॅन्ड इंटलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लि. नागपूर , पदांचे नाव सुरक्षा जवान       ( सिक्युरिटी गार्ड) , पदांची संख्या 1 हजार 500, शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी किंवा पदवीधर, शरीरीक पात्रता : वजन 50 कि.ग्रॅम, छाती 80 ते 85 से.मी. उंची 167 से.मी. यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष अशी राहील. वेतन हे दहावी करिता सुरुवातीस रुपये 6 हजार ते 9 हजार, बारावी व पदवीधरांसाठी सुरुवातीस 8 हजार ते 12 हजार पर्यंत ( योग्यता व पोष्टींगनुसार) देण्यात येईल. याचबरोबर प्रमोशन व  पेन्शन  आदि सुविधाही देण्यात येणार आहेत.
ही भरती उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र व इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता, वय, असल्यास अनुभव, इत्यादी मुळ प्रमाणपत्र आणि ॲटेस्टेड छायाप्रती व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वत:चा बायोडाटा आदि कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उस्मानाबाद व उमरगा येथे रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शनक केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
 
Top