पांगरी (गणेश गोडसे) वाहनचालकांना व प्रवाश्यांना अंतराचा अंदाज येण्याच्या उद्दात हेतूने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कडेला फर्लांग स्टोन, किलो मीटर स्टोन, सुरक्षेसाठी गार्ड स्टोन लावले जातात.मात्र पांगरी ता.बार्शी परिसरातील अनेक मार्गाना दिशा दर्शक फलकांचा अभावच आहे तर पांगरी-पाथरी मार्गावर कांही दिवसापूर्वीच बसवण्यात आलेले गार्ड स्टोननी आपल्या जागा दुसर्‍याच दिवशी सोडल्यामुळे लाखो रुपये खर्चून शाशनाने कोणाची सोय केली आहे असा सवाल या मार्गावरील प्रवाश्यामधून विचारला जात असून या मार्गावरील अंतर व दिश्यादर्शक फलक पुन्हा बसवावेत अशी मागणी होत आहे.बार्शीचा सार्वजनिक बांधकाम विभाग गांधारीची भूमिका बजावत असल्यामुळे जनतेमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
   सध्या उस्मानाबाद-कारी-पांगरी-पाथरी-भूम या अंतरजिल्हा मार्गावर अंतर दर्शक गार्ड स्टोन बसवण्याचे काम सुरू असून ठेकेदार काम करत पुढे सरकत असतानाच पाठीमागे त्या कामाच्या फक्त खुनाच शिल्लक राहत आहेत.गार्ड स्टोन उभारल्यानतर त्यावर पाणी न मारता व सिमेंटचा अत्यल्प वापर करून काम थातुर मातुर पद्धतीने उरकण्याकडे कल आहे.यात मजबुतीसाठी सीमेंट वापर जास्त होत नसल्यामुळे नवीन गार्ड स्टोन निखळून पडत आहेत.दीड फुटाचा खड्डा खोडून तो भरून जमिनीवर एक फुट फौडेशन करून त्यावर फर्लांग स्टोन बसवणे गरजेचे असतांना तसे काम होत नसल्याचे दिसून येत
   बार्शीच्या संबंधित अधिकार्‍यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे किमान सोलापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तरी याकडे लक्ष केन्द्रित करून काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अशी प्रवाश्यांची मागणी आहे.
चौकट:या कामाबाबत इंजिनीअर सचिन वासकर यांच्याकडे चौकशी केली असता संबंधित ठेकेदारास हे काम सिमेंट कोंकरेट मध्ये पुन्हा करण्यास सांगितले असल्याचे पुढारी प्रतींनिधीशी बोलतांना संगितले.
आहे.या कामाकडे बार्शीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याच वरिष्ठ अधिकार्‍याचे लक्ष नसून याकडे असाच कानाडोळा संबंधितांनी केल्यास शाशणाचे लाखो रुपये पाण्यात जाणार असून कांहीचे मात्र खिसे भरले जाणार आहेत.
 
Top