पांगरी (गणेश गोडसे) वाढते तान तनाव, बैठे काम त्यातून आरोग्याकडे लक्ष देण्यास अपुरा वेळ व आजच्या तरुणाईचा तालमिकडे (व्यायामशाळा) असलेले दुर्लक्ष्य यामुळे विविध आजाराला निमंत्रण तर मिळतच असून कधी काळी गावोगाव असलेल्या व दिमाखात वस्तादगीच्या जोरावर चालणार्‍या तालिमी,आखाडे  आज कुलूपबंद झाल्या आहेत तर कांही अखेरच्या घटका मोजत आहेत.महाराष्ट्रची कुस्ती कलेची  परंपरा जोपासण्यासाठी जुन्या तालीमी व आखाड्याचे योगदान खूप महत्वाचे असून त्याचे संगोपन होणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात लाल मातीचा आखाडा,तर शहरी भागात तालिम,व्यायामशाला आदि नावाने याची ओळख आहे.कुस्तीसारखा पारंपारिक क्रीडा प्रकार जीवंत ठेवणे समाजाच्या हितावाह ठरणार आहे.त्यासाठी तालिम व कुस्ती केंद्रांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.महाराष्ट्राच्या जुन्या आठवणींनांना जतन करण्यासाठी म्हणावे असे प्रयत्न होत नसल्याचे कुस्तीगीरांचे म्हणने आहे.
मात्र आजही समाज समाजातील तरुणांच्या शरीर बाळकटीकडे लक्ष देण्यास तयार नाही ही खूपच दुर्दैवी बाब आहे.शासनाचे विविध विभाग यावर कोट्यावधी रुपये खर्च करत असले तरी आधुनिक युवक,समाज याचा लाभ घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.जुन्या बुजूर्गांचा पुरातन व मौल्यवान ठेवा असलेल्या तालमींचे पुंनर्जीवन होणे काळाची गरज असून त्यासाठी समाजधुरिनांनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे.
व्यायामाचे आरोग्याशी असलेले नाते व महत्व अबाधित असतांनाही आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाकडे तरुण,ज्येष्ठ वृद्ध आदिसह सर्वच घटकांकडून होणारे दुर्लक्ष अक्षम्य असेच आहे.दिवसभर खुडचीवर बसून काम करणे,वाढती धावपळ,अपुरी झोप आदि कारणामुळे मानवाचे आयुर्मान दैनंदिन घटत चालले आहे.विविध ग्रंथ संपदेमध्ये साधू,ऋषि,मुनि जंगली पदार्थ खाऊन फळांवर जीवन जगून हजारो वर्ष जीवन जगल्याचे दाखले आहेत.लोकांनी शारीरिक तंदरुस्थी लक्षात घेऊन जागरूक होऊन पुन्हा तालमिकडे वळून भावी पिढीलाही याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
 तालमीचा व्यायामशाळा,जीम प्रवास: शासनाणे तरुणाच्या तंदरुस्थिसाठी अनुदान देऊन खाजगी तत्वावर व्यायामशाळांना मान्यता दिली आहे.त्यासाठी शासनाचा क्रीडा विभाग कोट्यवधी रुपये अनुदानातून खर्च करते.आधुनिक यंत्र सामुग्री,साहित्य यातून तरुणांना व्यायामाकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे.गाव तेथे व्यायाम शाळा हा उपक्रम शासन राबवत असले तरी आजही मोजक्याच गावात या योजनेचा लाभ घेतला जात आहे ही खेदजनक बाब आहे.व्यायामशाळेच्या उभारणीतून तरुणांनाही रोजगाराच्या संधि उपलब्ध होतात.नियमित अश्या शाळांनाचा आधार घेणार्‍या तरुणांना पोलिस दलासह विविध शासकीय निमशाकीय ठिकाणी नौकरीची संधीही उपलब्ध होऊ शकतात.
 
Top