उस्मानाबाद - शासनाने ठरवून दिलेल्या उदिष्ठानुसार जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आपल्याकडील प्रलंबित असलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अपूर्ण  कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो ) श्री.चव्हाण यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी व यंत्रणांचे सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
        रोहयोच्या कामांचा ग्रामीण स्तरावरील यंत्रणांनी आढावा घेऊन सदयस्थिती  पाहून तात्काळ कामे सुरु करुन डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करा. रोहयोतंर्गत पूर्ण व अपूर्ण कामांचा विभागनिहाय आढावा त्यांनी यावेळी घेतला. रोहयोमधून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रस्ताव पाठवून तात्काळ प्रथम प्राधान्याने मान्यता देऊन कामे सुरु करुन पूर्ण करण्याचे निर्देशही श्री पाटील यांनी संबंधित यंत्राणेला दिले. 
            श्री. तांबे यांनी  जिल्हयात सुरु असलेली व अपूर्ण असलेल्या कामे तात्काळ पूर्ण करा. सिंचन विहीर प्रपत्रा 1 मधील भाग 1 ते 4 प्रत्येक तालुक्यांनी भरुन प्रलंबित कामे सुरु करुन त्यांची माहिती तात्काळ संकेतस्थळावर अपलोड करावी. जर यंत्रणेला वेळोवेळी सूचना देऊन ती कामे होत नसेल तर संबंधित यंत्रणेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईलही त्यांनी सांगितले.
         श्री.उबाळे म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रलंबित ठेवू नयेत. नागरिकांची कामांचे प्रस्ताव येताच ते  मंजूर करुन काम सुरु करावे. प्रलंबित कामांची गावनिहाय यादी तयार करुन आढावा घ्यावा आणि गती वाढविण्यासाठी ग्रामपातळीवर आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच यंत्रणेचे सर्व अधिकारी व संबंधित उपस्थित होते.               
 
Top