उस्मानाबाद - जिल्हयात नोव्हेंबर 2014 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी करण्यासाठी योजना निहाय  अन्नधान्याचे मासीकनियतन मंजूर झाले असून सदर नियतनाची योजना निहाय लाभार्थी संख्यानिहाय अन्नधान्य ‍परिमाण खालीलप्रमाणे निर्धारीत केले असल्याचे  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद   यांनी कळविले आहे.
शिधापत्रिका धारकांसाठी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी  योजनेअंतर्गत गहू प्रतिकिलो 2 रुपये दराने प्रतिव्यक्ती 3  किलो, तांदुळ 3 रुपये दराने प्रतिव्यक्ती 2 किलो, अंत्योदय योजनेत गहू 2 रुपये दराने प्रतिकार्ड 20 किलो, तांदुळ 3 रुपये दराने प्रतिकार्ड 15 किलो, उर्वरीत एपीएल योजनेअंतर्गत गहू 7 रुपये 20 पैसे दराने 10 किलो, तांदुळ 9 रुपये 60 पैसे या दराने 5 किलो प्रतिकार्डास, बीपीएल योजनेअंतर्गत  साखर 13 रुपये 50 पैसे दराने 500 ग्राम दरडोई आणि अंत्योदय योजनेअंतर्गत साखर 500 ग्राम दरडोई निर्धारीत करण्यात आले आहे.
    याशिवाय जिल्हा प्रशासनाने केरोसीनचे तालुकानिहाय विक्रीचे दर कळविले असून ते प्रतिलिटरसाठी पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद 15 रुपये 80 पैसे, तुळजापूर 15 रुपये 70, उमरगा 15 रुपये 91 पैसे, लोहारा 15 रुपये 89 पैसे, कळंब 16 रुपये 04 पैसे, परंडा 16 रुपये, भूम 16 रुपये 01 पैसे आणि वाशी  16 रुपये 02  पैसे. 
 
Top