उस्मानाबाद -   भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र मुला-मुलींना CDS कंबाईंड डिफेंस सर्व्हीस साठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 25 नोव्हेंबर 14 ते 7 फेब्रुवारी, 15  या कालावधीत मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे, एन.सी.सी. धारकास प्राधान्य देण्यात येईल. ईच्छुक युवक/युवतींनी यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,उस्मानाबाद येथे दि. 20-11-14 रोजी दुपारी 3 वाजता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 02472-222557 असा आहे.                    
 
Top