बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा बार्शीच्या वतीने आयोजित केलेल्या शाहिर अमरशेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी डॉ.माधव पोतदार (पुणे), रफिक सूरज (कोल्हापूर), विकास सिंदगीकर (लातूर) यांची निवड करण्यात आली . बार्शी हे शाहिर अमर शेख यांचे जन्मस्थान असल्याने म.सा.प.च्या वतीने मागील नऊ वर्षांपासून साहित्यीकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी राज्यभरातून आलेल्या प्रस्तावातील डॉ.माधव पोतदार लिखित तेजाची आरती या व्यक्तिचित्र संग्रहाची , रफिक सूरज लिखित बेबस कथासंग्रह, विलास सिंदगीकर लिखित रक्त आणि भाकर या दिर्घ कथेच्या कथासंग्रहाची निवड करण्यात आली. पुरस्काराची निवड डॉ.सूर्यकांत घुगरे, डॉ.भारती रेवडकर यांनी केली आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल अशी माहिती बार्शी शाखेचे अध्यक्ष पां.न.निपाणीकर यांनी दिली. यचवेळी कार्यवाह शब्बीर मुलाणी, मुकूंदराज कुलकर्णी, शारदा पानगावकर, सुमन चंद्रशेखर, प्रकाश गव्हाणे, चंद्रशेखर कोरे आदी उपस्थित होते.
 
Top