पांगरी(गणेश गोडसे) बालकांचे प्रश्‍न,त्यांचे हक्क,समस्या याची सोडवणूक करण्यासाठी शाशन स्थरावर तसेच प्रशासकीय पातळीवर शर्थीचे प्रयत्‍न होत असले तरी अजूनही बालकांचे अनेक प्रश्‍न शिल्लक आहेत.पंडित नेहरूंच्या जयंतिदिनीचे औचित्य साधून या दिवशी भारतात शाळा,महाविद्यालये आदी विविध ठिकाणी बालदिन उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो.बाल हक्
जग बदलत असतांनाही समाजात खूप घृणास्पद व माणुसकीला काळिंबा फासणार्‍या घटना आज खुलेआम घडत आहेत.लहान मुलांचे अपहरण करून त्यांना वाम मार्गाला लावण्यासाठी समाजातील पुढारलेले धुरीनच पुढाकार घेऊन समाज बिघडवण्याचे काम करतात.हजारो लहान बालकांच्या अपहरणाचे हजारो गुन्हे पोलिसात दाखल आहेत.समाजातील कु-प्रवृतीच्या समाजकंटकाकडून गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून अफरणाची प्रक्रिया राबवली जाते.अफरण केलेल्या बालकांना भीक मागणे,मजुरीसाठी वापरणे,त्यांच्याकडून तस्करीची कामे करून घेऊन त्यांच्या जिवावर अमाप पैसा कमावला जातो.
सर्व शिक्षा अभियानाचा देखावा: शाशन सगळे शिकू या पुढे जाऊ या असे घोषवाक्य करून शासनाकडून शाळाबाह्य मुले मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.मात्र खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी कारणी लागतो का याचा शोध घेणे गरजेचे आहे.शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत.मुलाचे आई,वडील,शिक्षण विभाग यांनी बालकांच्या हक्काचा विचार करून त्यांना शिक्षण दिले पाहिजे॰
संस्काराचा अभाव :पालकांचे दुर्लक्ष्य ही बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत ठरत आहे. पालकांचे साचेबंद वेळापत्रक,बालकांकडे लक्ष देण्यासाठी असलेला अपुरा वेळ घरातील तान तनाव प्रसार माध्यम,संगणक आदि बाबींचाही लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.त्यामुळे लहान मुले सहाजिकच गुन्हेगारिकडे वळतात.बालकांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भावी पिढ्यांना याचा खूप मोठा धोका संभवू शकतो.या बाबीकडे कानाडोळा,दुर्लक्ष करून चालणार नाही.
कांच्या संरक्षनासाठी विविध सवस्था काम करत आहेत.बाल हक्कांच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी कायद्याने पोलिसाकडे देण्यात आलेली आहे.मात्र बालकांच्या हक्कांचे कायद्यानुसार रक्षण होते का? त्यासाठी अधिकार प्राप्त अधिकारी प्रयत्‍न करतात का असे अनेक प्रश्‍न बालदिनाच्या निमिताने समोर येणे गरजेचे आहे.बालमजुरी,बालकांचे शिक्षण,त्यांच्या मूलभूत दैनंदिन गरजा, अन्याय, अत्याचार, कौटुंबिक छळ, मानसिक शारीरिक त्रास आदीवर विचार होणे गरजेचे आहे.बालमजुरी कायद्याने गुन्हा असताना कामगार आयुक्तालयाकडून त्यासाठी केले जातात का हा सवशोधनाचा विषय आहे.
 
Top