बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) शुभम देवेंद्र कांबळे (वय १५) रा.कासारवाडी रोड,बार्शी या शालेय विद्यार्थ्यास किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याची तक्रार बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधीत विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
    शुभम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुलाखे हायस्कूल बाहेर एका मुलीची छेड सुरु असल्याचे पाहून विद्यार्थी शुभम कांबळे याने मुलीची छेड न करण्यास सांगीतले. त्यामुळे त्यास मारहाण करण्यात आली व दुचाकीवर बसवून सोलापूर रोडवरील इंडेन गॅस कार्यालयाजवळ नेण्यात आले. यावेळी त्यास मारहाण व दमदाटी करण्यास सुरुवात झाल्यावर शुभमला ओळखणार्‍या व्यक्तीने हाणामारी सोडवली. शुभमच्या वडिलांनाही धमकी दिल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत
 
Top