उस्मानाबाद  - येथील जिल्हा कारागृहात बंदी असलेले हनुमंत काशीनाथ गायकवाड  यांस 30 जुलै रोजी शासकीय रुग्‍णालय, उस्मानाबाद येथे जनरल वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात 31 जुलै रोजी दाखल केले.  बंदी हनुमंत गायकवाड यांचे लातूर येथे उपचार घेत असताना 31 जुलै 2014 रोजी रात्री 8-45 वाजता निधन झाले.
जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी यांची  चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती  केली आहे.
    फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 (2/1974) मधील दंडाधिकारीय चौकशीचे जे अधि कार आहेत ते सर्व अधिकार त्यांना असतील.  चौकशी  अधिकारी यांनी प्रकरणातील चौकशीचे आदेश प्राप्त होताच 1 महिन्याच्या  आत चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करावा,असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. 
 
Top