उस्मानाबाद -  हवामानावर आधारीत पथदर्शक पिक विमा योजना रब्बी 2013-14 अंतर्गत हरभरा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. एम. तोटावार यांनी केले आहे.
    या योजनेतून अवेळी पाऊस तापमान (कमी/जास्त) व आर्द्रता व या घटकापासून समाविष्ट पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी 20 हजार रुपयापर्यंत सरंक्षण मिळणार असल्याने शेतकऱ्यानी विमा हप्ता म्हणून भरावयाची रक्कम हरभरा पिकासाठी 900 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे बॅंकेत भरुन पिक संरक्षित करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा संबधित उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बॅकेशी संपर्क साधावा.        
 
Top