बार्शी -  नगर जिल्ह्यातील जवखेडा येथे दलित कुटूंबातील तीघांची निर्घूण हत्या करण्यात आली. बार्शीतील बहुजन समाज पार्टी आणि पुरोगामी पक्ष संघटना समितीच्या वतीने दोन वेगवेगळे मोर्चे काढण्यात आले. पाऊस सुरु असतांनाही कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चाद्वारे तहसिल कार्यालयावर येऊन निवेदन दिले.
   
दलित हत्याकांडानंतर पोलिसांना तपास कामासाठी अनेक दिवसांचा अवधी मिळाला. बराच कालावधी उलटूनही आरोपी निष्पण्ण होत नाहीत व त्यांना शिक्षा होत नाही याच्या निषेधार्थ राज्यभरातून पडसाद उमटत आहेत. याप्रसंगी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. जाधव कुटूंबियांना न्याय मिळावा, आरोपींना त्वरीत अटक करावी, आरोपींना पाठीशी घालणारांना निलंबित करुन सहआरोपी करावे नामांतर चळवळ, खैरलांजी हत्याकांड, सोनई खर्डा, जवखेडा आदी मानवतेला काळीमा फासणार्‍या घटना घडल्या आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौशी व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच वरिष्ठ न्यायालयात जाण्याची संधी देऊ नये. राष्ट्रपती लागवट असतांनाही दलितांवरील झालेल्या अन्यायाची दखल घेतली नाही त्यामुळे यापुढे पक्षाच्या वतीने विधानभवनावर तीव्र आंदोलन करण्यात येईल आदी विचार व्यक्त करण्यात आले. बहुजन समाज पार्टी :
    यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदिप घरबुडवे, संजय रिकिबे, गणेश शिंदे, तुकाराम घरबुडवे, विनोद घरबुडवे, राहुल चव्हाण, दिपक घरबुडवे, बाबासाहेब खडतरे, सचिन सोनवणे, बाळासाहेब कांबळे, विनायक बोकेफोडे, बाबासाहेब सरवदे, प्रसन्न नाईकनवरे, उत्तम आठवले, सोमनाथ नेरे, सतिश डोळसे, विजय शिंदे, दिपक बोकेफोडे, राजेंद्र बनसोडे, रणजीत सोनवणे, अमोल वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पुरोगामी पक्ष संघटना समिती :
    या मोर्चात कॉंग्रेस आय, कॉम्रेड, आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, फुले शाहू आंबेडकर विचारमंच, जनता दल सेक्युलर, राष्ट्रसेवा दल, संभाजी ब्रिगेड, शेतकरी पेन्शन संघर्ष समिती, सुटा संघटना, परिवर्तन विचार मंच आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
    याप्रसंगी कॉं.तानाजी ठोंबरे, कॉं.शौकत शेख, कॉं.प्रविण मस्तुद, हेमंत शिंदे, जीवन आरगडे, विक्रांत पाटील, आनंद काशीद, केतन शेळके, सत्तार शेख, संजय मोरे, अशोक कदम, डॉ.कोठावळे, बाबुराव जाधवर, रोहिदास कांबळे, संदिप अलाट, विष्णु नवगण, परमेश्वर शिंदे, महंमद शेख, रवि होनराव, गौरीशंकर होनराव, डी.डी.मस्के यांच्यासह विविध संघटनांच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top