उस्मानाबाद- महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळ, लातूर यांच्यामार्फत इयता 12 वी  प्रमाणपत्र परीक्षा माहे फेब्रु-2015 मार्च नियमित विदयार्थ्याचे फोटो प्रिलीस्टचे वितरण येत्या 8 डिसेंबर रोजी येथील जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, उस्मानाबाद येथे सकाळी  11 ते सायंकाळी 5 या वेळेत वितरीत  करण्यात येणार आहे. संबंधितानी साहित्य घेवून  जाण्यासाठी आपल्या प्रतिनिधीस  अधिकार पत्रासह पाठवावेत.
         तसेच ज्या प्रिलीस्टमध्ये दुरुस्त्या असतील, अशा प्रिलीस्ट बुधवार, दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत संकलन केंद्रावर मंडळ प्रतिनिधीकडे दुरुस्त्या करुन दयाव्यात, याची सर्व  मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक / प्राचार्यानी नोंद घ्यावी, असे आवाहन  विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी केले आहे.                    
 
Top