बार्शी -  लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने बार्शीत प्रतिबिंब या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय सभापती ला.अतुल सोनिग्रा यांनी दिली.
    स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात दि.७ डिसेंबर रोजी ही परिषद होत यावेळी डॉ.यशवंत पाटणे यांचे असून जगणे सुंदर आहे या विषयावरील व्याख्यान, खुले चर्चासत्र, लकीड्रॉ, पारितोषिक वितरण, वक्तृत्व स्पर्धा, बॅनर प्रेझेंटेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   
    लायन्सचे प्रांतपाल विजय राठी यांच्या हस्ते, द्वारकाजी जालान, आमदार दिलीप सोपल, जगदिश पुरोहित, नगराध्यक्ष रमेश पाटील, केशव पाठक यांच्या उपस्थितीत ही परिषदेद होणार आहे. बार्शीतील लायन्स क्लबच्या वतीने मागील चाळीस वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रम, कृषि प्रदर्शन, औद्योगिक प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव यांच्या मार्फत वेगळा ठसा उमटला आहे.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्सचे रविप्रकाश बजाज, राहुल दोशी, प्रकाश फुरडे, शरद पाटील आदी प्रयत्नशील आहेत. यावेळी अमित कांकरिया, संजय खांडवीकर, संजय गव्हाणे, विनोद बुडूख, जितेंद्र माढेकर आदी उपस्थित होते.
 
Top