पांगरी (गणेश गोडसे) कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व अभिवचन रजेवर सोडण्यात आलेला आरोपी रजेची मुदत संपुनही हजर झाला नसल्याची घटना गोरमाळे ता.बार्शी येथे घडली.
     संतोष शिवाजी राशिनकर रा.गोरमाळे असे कारागृहात हजर न झालेल्या आरोपीचे नांव आहे. कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी विक्रम गणपत सोनवणे रा.शासकीय निवास्थान कळंबा (कोल्हापूर) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गोरमाळे ता.बार्शी येथील बंदी क्रमांक सि.5775 श्री.संतोष राशिनकर हा आरोपी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.राशिनकर यांस दि.26.7.14 रोजी अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.त्यांने  26.8.14 रोजी कारागृहात हजार होणे गरजेचे असतांनाही आद्याप हजर झाला नाही.त्यामुळे सादर बंदी हा कारागृहाबाहेर आंनाधिकृत पने वास्तव्य करत आहे.कारागृह अधिकार्‍यांच्या फिर्‍यादिवरून शिक्षा भोगत असलेला आरोपीने विनापरवाना कारागृहाबाहेर वास्तव्य केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक ताप[आस हवालदार शेटे हे करत आहेत.
 
Top