उस्मानाबाद -  कोणत्याही आपत्तीच्या वेळी समयसूचकता आणि त्या आपत्तीपासून बाहेर येण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. सामान्य नागरिकांनाही प्राथमिक स्वरुपाची ही माहिती मिळाली तर आपत्तीपासून बचावासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने पोलीस, अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या मदतीने केलेली आपत्ती बचावाची चित्तथरारक प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली.
                येथील श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअमवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे, जिल्हा पोलीस दल, आरोग्य विभाग आणि अगिनशमन दल यांच्या साह्याने शालेय विद्यार्थी आणि विविध युवक मंडळांसाठी आपत्तीपासून बचावाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या कौशल्याने आणि बचाव करताना दाखविलेल्या सावधानता, वक्तशीरपणा आणि प्रत्येकाने आपली सेवा चोख बजावण्याच्या वृत्तीमुळे ही प्रात्यक्षिके अक्षरश: थक्क करणारी ठरली.
                जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. घुगे, शिक्षण, आरोग्य, क्रीडा विभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जिल्हा समन्वयक वृषाली तेलोरे आदींची उपस्थिती होती.
               यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की,जिल्ह्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. या कक्षाच्या कामाची माहितीही सर्वसामान्
              यावेळी, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने इमारतीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. इमारतीतून नागरिकांना दोरखंडाद्वारे बाहेर काढणे, इमारतीखाली अडकलेल्या जिवंत व्यक्तींची सुखरुप सुटका, आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ अगिनशमन दलाची मदत, जखमींना तात्काळ प्रथमोपचार सेवा आणि नंतर मदतीसाठी रुग्णालयात नेणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी  पोलीस दलाची मदत अशा पद्धतीने ही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली
यांपर्यंत जावी हा या प्रात्यक्षिके आयोजनामागील उद्देश आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या युवक मंडळांनी आपत्ती व्यवस्थापनाची माहिती व प्रशिक्षण घेतल्यास जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीपासून बचाव करणे अतिशय सोपे होणार आहे. त्याचबरोबर या मंडळांचा प्रशासनाबरोबरचा सहभाग हा जिल्ह्याच्या विविध चांगल्या कार्यक्रमांना दिशा देणाराही ठरणार आहे.
 
Top