बार्शी - मागील 22 दिवसांपासून पडसाळी (ता. माढा) येथील गावातील विद्युत रोहित्र बंद असल्‍याने ग्रामस्‍थांनी चकरा मारून शेवटी दिवसभर वितरणाच्‍या कार्यालयात ठाम मांडण्‍याचे ठरविले. सकाळी आकरा पासून ते रात्रीच्‍या आकरा पर्यंत कार्यालयात दहा बारा शेतकरी बसूनही कोणताही अधिकारी फिरकला नसल्‍याची बाब समोर आली आहे.
  ग्रामस्‍थांनी अधिका-यांविरोधात जिल्‍हाधिकारी व बार्शी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. यामध्‍ये विद्युत वितरण कार्यालयासमोर अधिकारी एस.आर. यादव, आर. डी जाधव, बी.एच. मलिकपेठकर यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. अधिका-यांनी ग्रामस्‍थांकडून 48500 रूपये भरून घेतले व तात्‍काळ तुमचे काम केले जाईल असे अश्‍वासन दिले. परंतू तक्रारीचे निवारण न हेलपाटे मारण्‍यास लावल्‍याने ग्रामस्‍थ संतप्‍त झाले आहेत. याप्रकरणी माढयाचे आमदार बबन शिंदे यांनीहि अधिका-यांना फोनवर ग्रामस्‍थांचे काम करण्‍यास सांगितले होते परंतू तांच्‍या विनंतीलाही अधिका-यांनी कचराकुंडी दाखवली आहे. जनावरे व शंतीसाठी पाण्‍याची टंचाई असल्‍याने नाराज झालेल्‍या ग्रामस्‍थांकडून प्रसंगी कायदा हातात घेतला जाईल बसेही निवेदनात म्‍हटले आहे.
 
Top