पांगरी (गणेश गोडसे) बार्शी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाच्यावतीने घेण्यात आलेल्या बार्शी तालुकास्तरीय स्पर्धेत कुसळंब ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाळेच्या विध्यार्थ्यांनी विविध  प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे.
  कु.मनस्वी मनोज गादेकर हिने वक्तृत्त्व स्पर्धेत बार्शी तालुक्यात प्रथम तर कथाकथन स्पर्धेत तालुक्यात दूसरा क्रमांक मिळवला.शर्वरी अजय चौधरी हिने वक्तृत्त्व व कथाकाथण स्प्राध्येत द्वितीय क्रमांक पटकावला.त्यांना श्रीमती.अर्चना राऊत याच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यश मिळवल्याबद्दल कुसळंब जि.प.शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोकेफोडे,केंद प्रमुख रामभाऊ कांदे,किशोर बगाडे,चांगदेव कांबळे,यांच्यासह विस्तार अधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
 
Top