उस्मानाबाद -  सन 2014-2015 या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेअंर्गत उत्पादीत दर्जाच्या है. ज्वारी, बाजरी, मका, भात, ज्वारी मालदांडी खरेदी अभिकर्ता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांची नेमणूका केली असून खालील खरेदी केंदा्रसाठी उपअभिकर्त्या संस्था कार्यरत राहतील.
           उपअभिकर्ता संस्था व खरेदी केंद्राचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद तालुक्यासाठी  तालुका सह. स. वि. संघ, उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यासाठी खंडोबा पणन सह. संस्था. म. अणदूर,  ढोकीसाठी- एल. एस. एम. पी. से. सो,  तेरसाठी- एल. एस. एम. पी. से. सो. बेंबळीसाठी- एल. एस. एम. पी. से. सो, वाशीसाठी-ता. सह. ख. वि. संघ लि. भूम व परंडा तालुक्यासाठी- शिवाजी भूम ता. सह. ख. वि. संघ, खामसवाडी व कळंबसाठी- खामसवाडी वि. का. से.सह. सो. माडज, उमरगा व मुरुमसाठी- माडज वि. का. सो. सह. सो. आणि लोहारासाठी- यशवंतराव चव्हाण कृषी उत्पन्न वि. सह. संस्था म. नागूर उपअभिकर्ता संस्था आहेत.
           प्राधिकृत खरेदी अभिकर्ता  यांनी कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार योग्य वजन करुन करुन पूर्ण रक्कम खरेदी केलेल्या दिवशीच देय करतील. धान्य खरेदीचे दैनिक हिशोब व व्यवहार नोंदी ठेवून  जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी ठरवून दिलेल्या दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक विवरणपत्र मुदतीत सादर करतील, धान्य प्रमाणित करणे, गोणी भरणे, साठवणूक करणे, पावसामुळे, चोरीमुळे धान्याची  नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, वजन मापे, काटा, पारडी, बांबू, तटे, ताडपत्री, सुतळी आदिची व्यवस्था करावी. कामात कसूर केल्यास संबंधितांकडून वसूली करण्यात येईल, जुने किंवा बिगर शेतकऱ्यांकडून धान/ भरडधान्य खरेदी झाल्यास त्याची जबाबदारीर प्राधिकृत खरेदी अभिकर्त्यावर राहील. कमी दर्जाचे धान/ भरडधान्य खरोदी करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा कर्मचाऱ्यांवर/ ग्रेडर्सवर कारवाही करण्यात येतील.
               तसेच निरीक्षणाच्यावेळी सर्व प्रकारची कागदपत्रे  निरीक्षकांस दयावे. शासन निर्णय क्र खरेदी 1014/587 दि. 30 ऑक्टोंबर 2014 च्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नोव्हेंबर 2014 ते 30 जुन 2015 व भरड धान्य ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नोंव्हेंबर ते 31 मार्च 2015 व भरडधान्य  मका 1 जानेवारी 2015 ते  31 मार्च 2015 पर्यत वैध राहील. याची संबधितानी नोंद घ्यावी  वरील सूचनाचे काटेकोटरपणे पालन करावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top