उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथे पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने रोजगार हमी योजने अंतर्गत शेतरस्ता आणि शिवरस्ता मंजुर करुन त्याचे अर्धवट कामकरण्यात आले आहे. या शेतरस्त्याबाबत कोणताही शासनाचा निर्णय, मार्गदर्शक सुचना नसताना देखील राजकीय द्वेशापोटी आणि अर्थपुर्ण व्यवहार करुन जुनोनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि ग्रामसेवकाने शेतरस्त्याची नोंद शेतकर्‍यांच्या परस्पर सातबारा उतार्‍याला घेतली आहे.शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर नोंदी घेण्याबाबत ग्रामसेवक गिरीधर एडके जबाबदार असल्याचे जुनोनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवीका यांनी शेतकरी आणि तक्रार निवारण अधिकारी मगर यांच्या समोर सांगीतले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील नोंदीबाबत गिरीधर एडके यांची चौकशी करावी अशी मागणी शेतकर्‍यामधुन केली जात आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी ग्रुप ग्रामपंचायती मार्फत झरेगाव येथे शेतरस्ता मंजुर करण्यात आला आहे. झरेगावमध्ये शेतरस्ता करत असताना ग्रामसेवक गिरीधर एडके यांच्या नावावर घेतलेल्या १०० रुपयाच्या स्टँपवरती शेतकर्‍यांची सहमती घेतली आहे. एका शासकीय कर्मचार्‍याच्या नावावर स्टँप घेवून शेतकर्‍यांची सहमती घेता येते का? या स्टँपवरती गट क्रमांक १३ ते २१ पर्यंत काणतेही माती काम न करता शेतकर्‍यांच्या सहमी घेवून शेतरस्ता करुण त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला आहे. जुनोनी ग्रामपंचायत राजकीय दबावापोटी सदर शेतरस्त्याचे काम कोणी केले, सातबारा उतार्‍यावर नोंदी घेण्याबाबत कोणी पाठपूरावा केला, शेतरस्त्याच्या काही कामाची बिले ज्या ठेकेदाराच्या नावे आहेत. त्याचा एडके परिवाराशी काय संबंध आहे का? याची उत्तरे देण्यास घाबरत आहे. दुसर्‍या बाजुला शेतरस्त्याची नोंदी घेण्याबाबत सातबारा उतार्‍यावर नोंदी घेताना तलाठी महोदयांनी नऊ नंबरच्या अर्जावर खोट्या आणि चुकीच्या सह्या केल्याचा अजब प्रकार माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. या खोट्या सह्या कोणी केल्या? हे तत्कालीन तलाठी यांनी शेतकर्‍यांच्या समोर सांगीतले आहे. त्यामुळे शेतरस्त्याच्या बोगस कामाबाबत आणि शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील नोंदी बाबत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि रोजगार हमी योजनेचे तक्रार निवारण अधिकारी यांनी चौकशी करावी. अशी मागणी शेतकर्‍यातुन केली जात आहे.
 
Top