बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) गुणपत्रिकेतील नकारात्मक गुणपध्दतीचा अवलंब केल्याने विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले. समन्वयाच्या अभावाने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय) शाखेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून विद्यार्थ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले.
    यावेळी पूजा कांबळे, नम्रता, निली, किशोर झेंडेकर, दत्ता चव्हाण, रोहित मोरे, धीरज जगताप, इम्रान सातारकर, सागर पवार, सुनिल चौधरी, शुभम गवळी, आनंद वजाळे, सचिन लंकेश्वर, महेश चव्हाण, समाधान कदम, अक्षय निलकंठ यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
     शिक्षण पध्दतीतील बदलामुळे यावर्षी जवळपास ८० टक्के विद्
    औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यशस्वी विद्यार्थी कुशल कामगार म्हणून काम करतात अनुत्तीर्ण केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे परीक्षा पध्दतीत केलेला बदल रद्द करावा. प्रत्येक विषयाची स्वतंत्र परीक्षा घ्यावी. हिंदी, इंग्रजी बरोबर प्रादेशिक भाषांत परीक्षा घ्यावी. कौशल्य व गणित विषयांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज करुन ग्रेस मार्काने उत्तीर्ण करावे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पुन्हा विचार करुन न्याय द्यावा. किमान २ हजारांचे विद्‌यावेतन द्यावे. प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची सोय करावी अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यार्थी अनुत्तीर्ण झाले. सन २०१२-१३ पासून सहामाही परीक्षा झाली व नकारात्मक गुण पध्दती लागू करण्यात आली. अनेक संस्थांना व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती दिली नाही. प्रश्‍न व उत्तरपत्रिकेवर याचा उल्लेख केला नाही व अन्यायकारक पध्दतीचा अवलंब केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
 
Top