उस्मानाबाद -  स्टेट बँक ग्रामीण  स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 45 वयोगटातील पुरुषासाठी उस्मानाबाद येथे 14 डिसेंबर ते दि. 13 जानेवारी,2015 या कालावधीत 30 दिवसाचे कॉम्पुटर टेलीचे प्रशिक्षण येथील राजे कॉम्प्लेक्स, 3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद  येथे आयोजित करण्यात आले आहे.
    या प्रशिक्षणात कॉम्पुटर पार्टस  सीपीयु, मेमरीसिस्टीम अप्लीकेशन, सॉफटवेअर एम एस ऑफीस, एक्सेल, टेली अकौंटींग बॅलेन्स शीट, प्रोफीट व लॉस अकौंन्ट डेबिट नोट क्रेडीट नोटचे प्रॅक्टीकल कोनटरा इंनटरी सजड्री बिटर सनड्री, क्रेडीटर कॅपीटल अकौंन्टस, चार्ट अकौंटस पूर्ण रिपोर्ट बॅलेन्स शीट व पी एल अकौंट कॅश बँक अकौउंट ग्रुपप्रमाणे डे वाईज मंथली पूर्ण शंका, इनव्हाइस बिल प्रिजटींग इनव्हाईस आदिचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  प्रशिक्षण कालावधीत तसेच जेवणाची व राहण्याची व्वस्था संस्थेमार्फत मोफत  केली जाणार असून कोर्स यशवीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुमचा स्वत:च व्यवसाय सुरु होईल व स्वत:च्या पायावर उभे राहाल.
इच्छुक पुरुषांनी या संधीचा लाभ घेवून स्वयंरोगाराची ‍निर्मीती करुन स्वावलंबी व्हावे असे आवाहन संस्थेचे संचालक आर. य. चुंबळे यांनी  केले आहे. प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवाशी दाखला, वय व  शैक्षणिक पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाइट  प्रमाणपत्र/ मार्कर्लिस्ट, आयडेंटीटी आकाराचे 5 फोटो आदि कागदपत्रासह व्यक्तीश भेटावे अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9763624998, 7030320255, 9923069923, 9552858521 व संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.                 
 
Top