नळदुर्ग - जिवनात शैक्षणिक गुणवत्‍तेलाच सन्‍मानित केले जाते, कारण शै‍क्षणिक क्षेत्रामध्‍ये गुणवत्‍ता व निकष लावला जातो असे मत प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी व्‍यक्‍त केले.
 नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयात कै. व्‍यंकटराव काका नळदुर्गकर विश्‍वस्‍त निधीच्‍या वतीने गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बालाघाट शिक्षण संस्‍थंचे कार्याध्‍यक्ष माजी आमदार सि.ना आलुरे गुरूजी तर प्रमुख अतिथी म्‍हणून संस्‍थेचे सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर व प्राचार्य रोडे हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्‍या व विश्‍वस्‍त निधीच्‍या वतीने प्राचार्य डॉ. एस.डी पेशवे, विश्‍वस्‍त निधीचे अध्‍यक्ष डॉ. अभय श्‍हापुरकर यांनी पाहुण्‍यांचा सत्‍कार केला. प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.  याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. रोडे म्‍हणाले की, शिक्षणातून प्रगती साध्‍य झाली तर जीवन यशस्‍वी होते. खडतर परिश्रमाशिवाय माणूस यशस्‍वी होत नाही. मानवी जिवनामध्‍ये कर्तबगारी घडविण्‍यासाठी भरपुर वाव आहे. 11वी ते बी.एस्‍सी या कालावधीत जर विद्यार्थ्‍यांनी स्‍वताला सावरून शिक्षण घेतले तर आपले ध्‍येय प्राप्‍त करू शकतात. परिश्रमाच्‍या बळावर असाध्‍य ते साध्‍य करणे यालाच जिवन असे म्‍हणतात. याप्रसंगी नरेंद्र बोरगांवकर माजी आमदार सि.ना आलुरे गुरूजी यांनीही विद्यार्थ्‍यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घ्‍यावे व आपल्‍या कुटुंबियाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहसचिव प्रभाकरराव (काका) नळदुर्गकर, संचालक अशोकराव पुदाले, यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालयाचे प्राचार्य जे.एस. मोहिते, सांस्‍कृतिक विभाग प्रमुख डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य (कनिष्‍ठ) प्रा. एस.जी बनसोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. संतोष पवार यांनी मानले. 
 
Top