उस्मानाबाद  -  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने आयोजित अपंगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अ.र. अंतुले यांच्या निधनामुळे क्रीडा स्पर्धेचे उदघाटन अतिशय साधेपणाने करण्यात आले. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्या त आला. उदघाटनाच्या प्रारंभी बॅ. अंतुले यांना श्रध्‍दाजली वाहण्यात आली.
येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडिअमवर या स्पर्धांना सुरुवात झाली. कोणतेही औपचारिक कार्यक्रम न होता केवळ अपंग विद्यार्थ्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांतील विविध क्रीडाप्रकारांना सुरुवात झाली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे यांनी स्पर्धांचे संयोजन केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह विविध अपंग शाळा-संस्थांचे संचालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. विविध क्रीडा प्रकारात 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. उद्या या स्पर्धांचा समारोप होणार आहे.
 
Top