उस्मानाबाद- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबादच्यावतीने येत्या 11 ते 12 डिसेंबर या कालावधीत सांस्कृतीक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक कलाकारांनी या  महोत्सवात  अधिकाधिक संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी, नरेंद्र पवार यांनी केले आहे.
                जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील विविध कलाप्रकाराचा समावेश असून त्यात 13 ते 35 वयोगटातील कलाकारांनी आपले बाबनिहाय प्रवेशिका सादर करावा. अधिक माहितीसाठी जन्मतारखेचा पुराव्यासह  10 डिसेंबरपर्यत श्रीतुजाभवानी स्टेडीयम येथे कार्यालयीन वेळेत  संपर्क साधावा.
              या युवा महोत्सवात लोकनृत्य कलाकारांची संख्या 20 असून वेळ मर्यादा 15 मिनीटाची आहे. लोकगीतात 6 कलाकारांची संख्या असून त्यास 7 मिनीटाचा कालावधी आहे. एकांकिका (हिंदी/ इंग्रजी) 12 कलाकार असून त्यास 45 मिनीटात सादर करावयाचे आहेत. शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी), सितार, बासरी, वीणा यात  कलाकारांची संख्या 1 असून प्रत्येकास 15 मिनीटाचा कालावधी, तबला, मृदंग, हॉर्मोनियम (लाईट) गिटार  कलाप्रकारात प्रत्येकी 1 कलाकार असून प्रत्येकास 10 मिनीटाचा कालावधी असून शास्त्रीय नृत्य (प्रत्येकी एक प्रमाणे), मणीपुरी, ओडीसी, भरतनाटयम कथ्थक, कुचीपुडीत कलाकारांची संख्या 5 असून प्रत्येकी 15 मिनीटाचा कालावधी, वक्तृत्व (हिंदी/ इंग्रजी) यात कलाकारांची संख्या 1 असून वेळ मर्यादा 4 मिनीटाचा कालावधी  आहे.
           जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी  होणाऱ्या युवक-युवती, कलाकारांनी आवश्यक साहित्य स्वत: आणावे, आयोजकांकडून फक्त स्टेज व माईकची व्यवस्था करण्यात येईल. पुर्वकल्पना दिल्यास विदयुत व्यवस्था पुरविण्यात येईल. एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व कलाकार तसेच लेखक/ निर्माता/ दिग्दर्शकसुध्दा वरील वयोगटातील असावे, सहभागी होणारा युवक जिल्ह्यातील रहिवासी असावा, ज्या बाबीना साथसंगीत आवश्यक आहे, त्या कलाकारांना वयोमर्यादा लागू नाही व वादयांच्या व्यवस्था स्वत: करणे आवश्यक आहे, शास्त्रीय नृत्य सादर करणाऱ्याना कलाकारांना पुर्वमुद्रीत ध्वनीफीतीवर कॅसेट/ सीडी कार्यक्‌रम सादर करता येईल.
            लोकगीत व लोकनृत्य प्रकारातील गीते शक्य चित्रपट बाहय असावीत, सर्व बाबीसाठीचे वेळेचे बंधन राहील, जास्त वेळ गुणांकणासाठी ग्राहय धरले जाणार नाही, परीक्षकांचा निर्णय अंतीम असेल, आयोजनात ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा आयोजकास अधिकार राहील, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.                           
 
Top