पांगरी(गणेश गोडसे)  बार्शी तालुका पंचायत समिती व नागनाथ हायस्कूल घारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले दोन दिवशीय बार्शी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दि.11  रोजी पुरी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इन्स्टट्यूट येथे भरवण्यात आले असून तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी यात सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन   नागनाथ हायस्कूल घारीचे चेअरमन गुलाबराव ठोंबरे यांनी प्रशिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
    विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बार्शी पंचायत समितीचे सभापति भाऊसाहेब काशिद यांच्या हस्ते तर बार्शी पं.समितीचे गट  विकास अधिकारी प्रशांतसिह मरोड हे अध्यक्षस्थाणी असणार आहेत.यावेळी नगराध्यक्ष रमेश पाटील,वर्षाताई ठोंबरे,विलास वळेकर,गट शिक्षनाधिकारी एल.एस.जाधव आदि उपस्थित रहाणार आहेत.
   या 40 व्या प्रदर्शनामध्ये विध्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक व नावीन्यपूर्ण प्रतिकृती,गणिती क्रिया,प्रदूषण,शेती-व्यवस्थापन आदि विविध विषयावरील प्रतिकृती विद्यार्थी या प्रदर्शनात वेगवेगळ्या दालनात सादर करणार आहेत.तसेच एका दालनात टाकावू वस्तूपासून तयार केलेल्या टिकावू वस्तूचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.दुसर्‍या दालनात विज्ञान यात्रेचे व फन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.11 व 12 डिसेंबर रोजी पार पडणार्‍या विज्ञान प्रदर्शनास भेट देण्यासाठी बार्शी येथून पुरी पर्यन्त मोफत बसची सोय करण्यात आलेली आहे.
 
Top