नळदुर्ग - तुळजापूर येथे 27 ते 30 नोव्‍हेंबर रोजी झालेल्‍या अंतर्गत विद्यापीठ खेळांमध्‍ये नळदुर्ग येथील कला, विज्ञान वाणिज्‍य महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्‍पर्धेत कबड्डी खेळात अपले वर्चस्‍व निर्माण करीत नंबर 1 चा बहुमान मिळविलात सेचकराटे आणि बॉक्‍सींगमध्‍ये सुवर्णपदक मिळवले. या स्‍पर्धेत महाविद्यालयातील एकुण 14 स्‍पर्धकांनी सहभाग केला होता.
त्‍यापैकी सात विद्यर्थ्‍यांनी सुवर्ण पदकाची कमाई करित महाविद्यालयाचे नावलौकिक करून इतिहास रचला आहे. या सर्व विद्यार्थ्‍यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे सत्‍कार करून गौरव करण्‍यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, प्रा उमाकांत चनशट्टी प्रा. घोरपडे, प्रा. सोनटक्‍के, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, शहरमंत्री मोहित कलकोटे, गणेश किल्‍लेदार, हणमंत मोरे, मयुर महाबोले, कैलास घाटे, अभिजीत लाटे, रामशेट्ठी पाटील प सर्व कार्यकर्त उपस्थित होते.
 
Top