उस्मानाबाद -   महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ परिषद, पुणे यांचेमार्फत विहित अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र परीक्षार्थींची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उस्मानाबाद येथे रविवार, दिनांक 14 डिसेंबर,2014 रोजी सकाळी  10 ते 1 व दुपारी 2 ते 5 या वेळेत दोन सत्रात 29 केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे 8 हजार 408 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (पूर्नवसन) अरविंद लाटकर यांनी दिली.
      उस्‍मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीस पोलीस जिल्हा विशेष शाखेचे एस.व्ही. नेवसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)आर.डी.जोशी, शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) एस.बी.गायकवाड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.आर.शिंदे,  उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन.आर. जगदाळे, विस्तार अधिकारी एस.बी. वाघमारे, यु.ए.सांगळे यांची उपस्थिती होती.
श्री.लाटकर यांनी पूर्वतयारी आढावा घेतना म्हणाले की, या परीक्षा कालावधीत 68 पर्यवेक्षक, 339 समवेशक, 29 लिपीक, 56 परिचर असे एकूण 521 अधिकारी /कर्मचारी यांची नेमणूका  करण्यात येणार आहे. मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून या समितीचे सदस्य सचिव म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) हे राहणार आहेत. या परीक्षेचे स्वरुप 150 गुणाची 150 वस्तूनिष्ठ प्रश्‍न आणि बहुपर्यायी उत्तरे असणारी एकच प्रश्‍न पत्रिका दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचाची नियुक्ती , भरारी पथक, केंद्रावर लावण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, सर्व कामकाजाचे योग्य नियोजन, मंडळ परिषदेने दिलेल्या पुस्तिकेतील सूचनानुसार कार्यवाही करुन नियोजन करणे, विद्यार्थी प्रशस्त बसतील यासाठी नियोजन, या परीक्षेची माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन माध्यमातून परीक्षा होईल, परीक्षार्थींना परीक्षेच्या परीक्षेच्या वेळी त्यांनी निवडलेल्या माध्यमाची प्रपत्रिका दिली जाईल परीक्षापूर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
 
Top