उस्मानाबाद - माजी सैनिक/ युध्द विधवा/ माजी सैनिकांच्या विधवा पत्नी अवलंबिताच्या कल्याणाच्या दृष्टीकोनातून स्टेशन हेडक्वॉटर्स, अहमदनगर यांनी सूचित केल्यानुसार ई. सी. एस. एस. पॉलीक्लीनिकमध्ये कंत्राटी पध्दतीने मानधनावर एक वर्षाकरीता (अधिक कालावधीकरीता नुतनीकरण) खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहे.     
         इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज 25 डिसेंबरपर्यत स्टेशन हेडक्वॉटर्स, अहमदनगर, जामखेडरोड पोस्ट कॅम्प,अहमदनगर-414002 येथे  अर्ज पाठवावेत, असे आवाहन मेजर सुभाष सासने (नि),  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    ऑफीसर इन चार्जची 2 पदे सोलापूर आणि उस्मानाबाद प्रत्येकी एक प्रमाणे ( दरमहा वेतन 46 हजार रुपये), मेडीकल स्पेशालिस्ट अहमदनगरसाठी  एक पद (द.म. वेतन 55 हजार), मेडीकल ऑफीसर बीडसाठी एक पद (द.म.वेतन 46 हजार), डेंन्टल टेक्निशियन तीन पदे अहमदनगर, उस्मानाबाद व बीड येथे पद भरण्यात येणार असून द. म. वेतन 15 हजार इतके आहे. 
अधिक माहितीसाठी स्टेशन हेडक्वॉटर्स अहमदनगर, जामखेड रोड, पोस्ट कॅम्प अहमदनगर दुरध्ववनी क्र.0241-2323565/2321233, ई-मेल echscellstnhqnagar@yahoo.com अधिक माहितीसाठी www.echs.gov.in संकेतस्थळावर भेट देवून विहीत मुदतीत अर्ज भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.              
 
Top