उस्मानाबाद -  भारत सरकार, कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी फार्मर पोर्टल सुरु करण्यात आले असून यात कृषीच्या संबंधित विषयाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पोर्टलमध्ये mkisan.gov.in मधुन प्रत्‍येक शेतकऱ्यास हवामान, किडरोग नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादन आदिबाबत एस. एम. एस. प्राप्त माहिती  करुन घेण्यासाठी नोंदणी करता येते. आजपार्वेतो राज्यातील  16 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी करुन या सेवेचा लाभ घेतला आहे. याव्दारे एस. एम. एस. व्दारे माहिती प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामाचे नियोजन करणे सुलभ होणार  आहे.
    या सेवेत नवीन नोंदणी करण्यासाठी  mkisaan.gov.in व जाऊन registration for sms या विकल्पातून नोंदणी करावी व कृषि उपसंचालक (प्रकल्प). कृषी आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-5 यांच्याकडे पत्राव्दारे स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा पीकांची माहिती अंतर्भूत करुन kisansms.mh@gmail.com या  EMail व स्वत:ची माहिती पाठवून स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, तालुका व जिल्हा पीकांची माहिती अंतर्भूत करुन या सेवेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन कृषि आयुक्त, पुणे यांनी केले आहे.        
 
Top