उस्मानाबाद -  महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्यांअंतर्गत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा घेण्यात येण्यात येणार असून सिंचन व्यवस्थापनात लाभधारकांचा सहभाग वाढावे व संस्था कार्यक्षम राहून स्वबळावर सुदृढपणे कार्यरत राहावे, संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणांऱ्यांनी आपले विहीत नमुन्यात अर्ज 31 डिसेंबरच्या आत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, उस्मानाबाद  यांच्या कार्यालयात  पाठवावीत. विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत.
    प्रादेशिक स्तरावर पुरस्काराची रक्कम प्रथम येणाऱ्या स्पर्धकास क्रमांक 3 लाख व प्रशस्‍तीपत्र , व्दितीय क्रमांक रु 2 लाख व प्रशस्तीपत्र, राज्‍यस्तरावर पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 7 लाख, व्दितीय क्रमांक 5 लाख  व तृतीय क्रमांकास 3 लाख व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. यशस्वी स्पर्धकास  पुरस्काराचे वितरण 26 फेब्रवारी 2015 रोजी सिंचन दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे, औरंगाबाद तथा सदस्य सचिव, महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान कृती समिती, नाशिक व मराठवाडा प्रदेश यांनी संयुक्तरीत्या एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे
 
Top