बार्शी  -  फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ, अमरशेख विचार प्रतिष्ठानच्या वतीने लेखिका विद्या बाळ, डॉ.बी.वाय यादव, कॉं.नामदेव चव्हाण, टेनिसपटू कु.प्रार्थना ठोंबरे यांना जीवन गौरव पुरस्कार २०१४ जाहीर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.मधुकर फरताडे यांनी दिली.
    १५ डिसेंबर रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली, कॉं.तानाजी ठोंबरे, उत्तमप्रकाश खंदारे, राजा माने, वायुपुत्र नारायण जगदाळे, बाळासाहेब कोरके, नामदेव रास्ते, संतोष ठोंबरे यांच्या उपस्थितीत होत आहे.
    यावेळी राज्यस्तरीय कवि संमेलन, जनजागृती प्रदर्शन फेरी, शाहिरी जलसा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदिप अलाट, डॉ.भारती रेवडकर, उमेश पवार आदी प्रयत्न करीत आहेत.
 
Top