पांगरी(गणेश गोडसे) कुसळंब ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय बोकेफोडे यांची तर उपाध्यक्षपदी सौ.धनश्री चौधरी यांची निवड झाली आहे.समितीच्या सदस्यपदी हरिशचंद्र शिंदे,मनोज गायकवाड सौ.अर्चना गादेकर,शिक्षण तज्ञ हनुमंत काळे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.समितीचे माजी आध्यक्ष राजेंद्र शिंदे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी याच्या हस्ते  तर नूतन अध्यक्ष संजय बोकेफोडे यांचा सत्कार तंटामुक्क्ती आ
द्याक्ष गणेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.प्रास्ताविक अर्चना राऊत यांनी तर सूत्र संचालन सुनीता अंबुरे यांनी केले.आभार मंगल शेळके यांनी मानले.
 
Top