उस्मानाबाद - भारत देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र खडा पहारा देवून देशाची सेवा बजावणारे आपले शुरवीर सैनिक संरक्षण करतात. देशात अचानकपणे   उदभवणा-या कायदा आणि सुव्यवस्थाविषयी समस्या असो, अतिवृष्टी, वादळे किंवा भुकंपासारखे आपत्तीच्यावेळी नागरीकांच्या मदतीला तात्काळ धावून जावून परिस्थिती नियंत्रणात आणतात. देशासाठी प्राणार्पण करतात. त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबासाठी शासन कल्याणकारी योजना राबवित असते. सैनिकाचे अमुल्य कामगिरी लक्षात घेवून सैनिकाचे कर्ज अल्प प्रमाणात परत करण्याची अप्रतीम संधी  ध्वजादिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यास प्राप्त झाली आहे. तेंव्हा या कर्जमुक्ती संधीचा सर्व समाजातील घटकांनी लाभ घेवून ध्वजनिधीस  सढळ हाताने मदत करा, जिल्ह्यास ध्वजनिधी संकलनाचे दिलेले  उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले.
    येथील जिल्हापरिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे सशस्त्रसेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करताना श्री. तांबे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उबाळे, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राकेश कलासागर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, सहनिबंधक श्री.जाधव, कार्यकारी अभियंता श्री. कोरे, प्राचार्य श्री. पडवळकर, वन विभागाचे बी. जी. भांगे, सुमन पाटील, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी  सैनिक, विधवा, पाल्य आदि उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तांबे म्हणाले की, जेंव्हा आपण आपल्या कुटूंबियासह सुखाचे व सुरक्षेतेचे जीवन व्यतीत करीत असतो त्याचे सर्व श्रेय त्या जवानाकडे जाते. की जे भारताच्या सीमेवर सर्व नागरीकांचे प्रतिनिधी या नात्याने देशाचे रात्रं-दिवस संरक्षण करत आहेत व येणाऱ्या बाहय/आंतरिक किंवा नैसर्गिक संकटांना तोंडण्यासाठी सदैव सज्ज राहतात. ते त्यांचे कर्तव्य, सेवा बजावत असतात. प्रत्येक नागरीकांनी त्यांच्या सेवेची जाण ठेवून ध्वजनिधीत मोलाचा वाटा उचलणे गरजेचे आहे. सैनिक देशाचे संरक्षणासाठी सैनिक शहीद होतात तर कांही सैनिक कायमचे अपंग होतात. कांही दुर्धर आजाराने त्रस्त असतात. त्यांच्या पश्चात जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील दैनंदिन अचडणी दूर व्हावे व  त्यांचे जीवन सुसह्य  व्हावे व युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनासाठी  ध्वजनिधीत जमा झालेला निधी हा जवान/शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी मदत करत असल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर (नि.) सुभाष सासणे यांनी प्रमुख पाहूण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.आपल्या प्रास्ताविकात सन 2013 मध्ये  ध्वजदिन निधीचे 41 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 38 लाख 55 हजारांचे ध्वजनिधी संकलन करण्यात आले. यंदा या जिल्ह्यास 40 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची तसेच ध्वजदिन संकलन निधीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हयात 3 हजार 371  माजी सैनिक,  908 विधवा, 9 युध्द विधवा, 1 वीरमता, 1 वीरपिता असे एकुण 4 हजार 290 माजी सैनिक असल्याची माहिती दिली.
यावेऴी  वीरमाता/ वीरपत्नी/ युध्द विधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सन 2014-15 या वर्षात माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय व अवलंबिताकरीता  कल्याणकारी निधीमधून 6 लाख 14 हजार 226 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यात 28 लाभार्थ्यांचे चरितार्थासाठी आर्थीक मदत 33 हजार, 15 लाभार्थींच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थीक मदत 72 हजार, 32 लाभार्थींचे अंत्यविधीसाठी 96 हजार,  मतिमंद पाल्यांना 3 हजार, 13 लाभार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आर्थीक मदत 13 हजार, 33 लाभार्थ्यांना व्यवसायीक शिक्षणासाठी 2 लाख 79 हजार 900, शिष्यवृत्ती  आर्थीक मदत- 6 लाभार्थ्यांनांस 18 हजार, एम.एस. सी आय टी संगणक प्रशिक्षणासाठी 3 लाभार्थ्यांस 7 हजार 500, सैनिकी शाळेसाठी आर्थीक मदत-  5 लाभार्थ्यांस 35 हजार, स्वयंरोजगारासाठी एक लाभाभर्थ्यांना आर्थीक मदत 28 हजार, घरबांधणी योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांस 20 हजार आर्थिक मदत आणि 1 शहीद जवानाच्या अंत्यविधीकरीता 8 हजार 751 रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी ध्वजदिन निधी संकलन कार्यालयात योगदान देणारे शासकीय अधिकाऱ्यांचा भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यात शिक्षण, गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, प्रादेशिक परीवहन विभाग, कृषी, सहकार, महसूल, बांधकाम, पाटंधारे, नगर परिषद, आरोग्य, पाटबंधारे, मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन, राज्य वीज वितरण कंपनी, लघुपाटबंधारे, पुरवठा विभाग, जिल्हा ग्रामीण‍विकास यंत्रणा, उपविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, मत्स्य, विक्रीकर, जिल्हा पशुसंवर्धन, जिल्हा कोषागार, जिल्हा उदयोग केंद्र, समाज कल्याण, नगर रचना, सहायक धर्मादाय आयुक्त, आदि विविध यंत्रणेंचा भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिररिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उबाळे म्हणाले की, सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व घटकांनी ध्वजनिधी  संकलनात मदत करण्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक वाय.के. पठाण  यांनी केले. आभार मेजर सुभाष सासने यांनी मानले. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी युध्दात शहीद  झालेल्या सैनिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी/विरमाता यांचा सन्मान प्रमुख पाहूण्यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक विकास मंडळ, उमरगा यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सैनिक दिनदर्शिकेचे प्रकाशन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सासणे  यांच्या हस्ते करण्यात आले. येथील श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताचा कार्यक्रम सादर केला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.   
 
Top