पांगरी(गणेश गोडसे) पांगरी भागात वन्य प्राण्यांना पाण्याची टंचाई भासू लागली असून वनखात्यानेही त्यावर तात्काळ उपाय योजना करून जंगलात गरजेच्या ठिकाणी व प्राण्यांच्या वर्दळीच्या जागी पानवठे तयार करण्यास सुरुवात केली आहे.नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र उपलब्ध नसलेल्या उक्क्डगाव येथील जंगलात जंगली प्राण्यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी अगोदर अंडाकृती खोदाई करून त्यात प्लास्टीक पेपर टाकून नंतर जंगली दगड गोटयांची पिचिंग करून परत त्यावर वाळू टाकून त्यात पानी सोडून नैसर्गिक पद्धतीचे पानवठे तयार मुक्या प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे. जंगलातच पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे प्राणी बाहेर पडून  शेतकर्‍यांचे शेतीचे होणारे नुकसानही वाचणार आहे. उक्कडगाव येथील जंगलात मोर, लांडोर, हरिण, ससे, रानडुक्कर, आदि विविध वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.
     पानवठे तयार करण्यासाठी तालुका वनक्षेत्र अधिकारी श्री.आर.बी.धुमाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री.तोगे,वनरक्षक श्री.आर.एस.शेळके,वनमजुर प्रभाकर जानराव,श्री.सी.एल.ढोणे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top