बार्शी -  सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी आयोजित केलेल्या शिबीरात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बराच वेळ थांबावे लागते. त्यांच्यासाठी इतर दिवशीही मोफत तपासणी करुन औषधोपचारात सवलत देण्याची घोषणा प्रसिध्द विशारद डॉ.विजयकुमार केसकर यांनी केली. 
        शुक्रवारी दि.१९ रोजी रेणुका मंगल कार्यालयातील रौप्यमहोत्सवी अधिवेशनात स्वागत व सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश पाटील, कोषागार अधिकारी प्रविण मानकर, लेखाधिकारी अजितसिंह पवार, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे कार्याध्यक्ष चिंतामणी प्रभुणे, सोमनाथ नाईक, डी.डी.नागराशी, एस.व्ही.उंब्रजकर, प्रभुलिंग स्वामी (सर), अंबादास दानवे, श्री.डांगे, श्री.उबाळे, श्री.होसमणी आदी उपस्थित होते.सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध समस्येंची सोडवणूक करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. संघटनेमार्फत नियमितपणे सेवानिवृत्तांचे विविध प्रश्‍न हाताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातून विविध ठिकाणच्या निवृत्त कर्मचार्‍यांनी बार्शीतील संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. रमेश पाटील म्हणले, संघटनेच्या कार्यालयासंदर्भात असलेल्या सर्व समस्या काही दिवसांतच सोडविण्यात येतील. संघटनेचे अध्यक्ष वागी म्हणाले सर्व सहकार्‍यांच्या सहकार्याशिवाय संघटना चांगल्या रितीने चालविणे शक्य नव्हते. प्रभुलिंग स्वामी म्हणाले, संघटनेच्या वतीने संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाकरिता कार्यशाळांचे आयोजन करावे. यामुळे स्वातंत्र्याचे अपुरे स्वप्न फलद्रुप होईल. शासनाच्या वतीने राबविलेल्या संकल्प सारख्या योजनांचा सेवानिवृत्तांनी फायदा घ्यावा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाकिस्तानमधील निरपराध विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. श्रीमती शारदा पानगावकर यांनी स्वागतगीत गायले. दिपप्रज्वलनानंतर अध्यक्ष व्ही.बी.वांगी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवनगंध या रौप्यमहोत्सवी स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुमन चंद्रशेखर यांनी केले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिलकुमार बंडेवार, आर.डी.लिंबकर, डी.आर.शेटे, व्ही.जी.लोखंडे, व्ही.बी.वांगी, एच.के.मुळे, ए.ए.मुळे, ए.ए.पटेल, यू.डी.पोतदार, एस.एल.गायकवाड, बी.बी.रणझुंजारे, सौ.सुमन बारसकर, व्ही.पी.माळकर, ऍड्.एस.बी.शिंदे, के.जी.होनखांबे, एच,एम.गरड, भैय्या अत्रे, श्रीमती ज्योत्स्ना पाटील आदींनी परिश्रम घेतले.
 
Top